Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीनांदेडमराठवाडासाहित्यगंध

‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या ऋणात मी; बळवंत डावकरे

कटू आठवणी आणि अनुभव

0 4 8 2 8 5

‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या ऋणात मी; बळवंत डावकरे

कटू आठवणी आणि अनुभव

न विसरता येणाऱ्या
कटू आठवणी
करिता सायास
असाध्य ते साध्य

साप्ताहिक साहित्यगंध १४६ प्रकाशित होणार की नाही ही शंका मनाला स्वस्थ बसू देत नव्हती.अंक प्रकाशित करण्यासाठी येणाऱ्या नाना अडचणीवर मार्ग काढताना होणारी दमछाक क्वचितच आपल्या लक्षात आली असेल. “संकटे ही संयमाची परीक्षा घेत असतात”. पण याही प्रसंगावर आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी मात करत राहुलभाऊ व संपादक मंडळांनी हा अंक प्रकाशित केला याचा खूप आनंद व अभिमान वाटला.

“कठीण समय येता कोण कामास येतो” अशावेळी ‘मराठीचे शिलेदार’ समूहातील सर्व शिलेदारांनी एकजुटीचे दर्शन घडवले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. सकाळी सकाळी भाऊंचा “तुमचा फोटो पाठवा” हा संदेश वाचला. मागच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत फोटो पाठवता आला नव्हता,पण यावेळी लगेच प्रतिसाद दिला.कांही वेळातच माझी ‘कटू आठवणी’ ही चारोळी सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकल्याचा संदेश वाचावयास मिळाला व मनस्वी आनंद झाला.

दि. २६/११चा दहशतवादी हल्ला मन हेलावून टाकणारा होता.या बिकट प्रसंगातही आपल्या जिगरबाज मावळ्यांनी धीरोदात्तपणे सामना करुन कट उधळून लावला.कित्येक वीर मातृभूमीच्या रक्षणार्थ शहीद झाले.या कटू आठवणी आजही डोळ्यासमोर आल्यानंतर थरकाप उडतो.

आतंकवाद बंद कराया
लढू मिळून आपण सारे
दहशतवाद मोडीत काढू
भारतीयांनो एक व्हा रे

एकजुटीची वज्रमूठ बांधून भारतातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करु या. पुनश्च एकदा सर्वांच्या ऋणात मी.

श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे