
0
6
2
8
1
4
सर आली धावून
जात होतो शाळेत
सर आली धावून..
चिंबचिंब झाले सारे
आम्ही निघालो न्हाऊन..
बसलो होतो वर्गात
सर आली धावून…
शाळेभोवती तळे झाले
गमंत वाटली पाहून…
पोहत होतो तळ्यात
सर आली धावून…
मज्जा केली सर्वांनी
एकमेकांवर पाणी उडवून..
खेळत होतो अंगणात
तर सर आली धावून..
होड्या सोडल्या पाण्यात
पण सरीने टाकल्या भिजवून..
सर आली धावून म्हणत म्हणत
बाहेर कोसळतो धो-धो पाऊस..
शाळेच्या सुट्टीचा आला कंटाळा
आई म्हणे,फिटली बाळा सुट्टीची हौस…
मृदुला कांबळे
गोरेगांव, जि.रायगड
0
6
2
8
1
4



