अहमदनगरई-पेपरकवितासाहित्यगंध
बंधनात मी
0
4
8
2
8
6
बंधनात मी
शृंखला भारतभूच्या तुटल्या
मिळाले स्वातंत्र्य भारताला
मुखी सर्वांच्या रामनाम होते
तरी होतो बंधनात मी
देश स्वतंत्र झाला
आनंदोत्सव साजरा केला
भाषावार प्रांत जाहले
अडकलो भाषेच्या बंधनात मी
सतीची प्रथा बंद झाली
लेकीसुनांना दिलासा मिळाला
पण अडकले बिभत्स लांडग्यांच्या
वासनेच्या बंधनात मी
स्त्री पुरुष समानतेचा घोष
मी निवडणूक जिंकले
पण कारभार धन्यानेच पाहिला
हक्क मज असता बंधनात मी
बी.आर.पतंगे
जि.अहिल्यानगर
=========
0
4
8
2
8
6



