0
4
8
2
8
6
शब्दांचा खेळ ..!
शब्दांचा खेळ ..!
शब्दांशी चाळा.!
करुन यमक गोळा;
ल्याली श्रृंगार सोळा..!
भावभावनांचे बंध..!
दरवळे अर्थरूपी सुगंध.
उमलावा केशरी जास्वंद ..!
मिसळावे तुझ्यात संबंध.
वाटे कधी जगावे..!
तुझ्या सम मुक्तछंदी !
हिच असावी बहुतेक ,
माझ्या उद्धाराची नांदी.!
कविते तव मिठीत ;
विरघळावा शब्दन् शब्द..!
अशी स्फूरावी कविता ;
व्हाव्यात भावना निःशब्द ..!
रचावी अशी रचना…
रुजावी मनामनात
बहरावी पुस्तकी दुनियेत,
असे व्हावे बेधुंद मी कवितेत…!
सौ.संगीता मेश्राम
भिलगांव,नागपूर
========
0
4
8
2
8
6



