उमरेड येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची सहविचार सभा
रजत डेकाटे - प्रतिनिधी

उमरेड येथे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनची सहविचार सभा
उमरेड उपविभागीय शाखेच्या अध्यक्षपदी सुरजलाल येल्ले, सचिवपदी मधुकर मडावी यांची निवड
रजत डेकाटे – प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
उमरेड:- ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका शाखा उमरेड, भिवापूर व कुही यांच्या संयुक्त विद्यमाने उमरेड येथे श्री. मधुकर मडावी यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष माननीय मधुकरजी उईके होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सरचिटणीस माननीय विजय कोकोडे उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष मसराम सर, सचिव भलावी सर तसेच मार्गदर्शक कन्नाके साहेब, मरसकोल्हे साहेब, सराटे साहेब यांच्यासह केंद्रीय व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि फेडरेशनचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
या सभेच्या निमित्ताने उमरेड उपविभागीय शाखेचे पुनर्गठन करण्यात आले. केंद्रीय व जिल्हा कार्यकारिणीच्या उपस्थितीत अध्यक्षपदी श्री. सुरजलाल येल्ले तर सचिवपदी श्री. मधुकर मडावी यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून संतोष पेंदोर, महिला उपाध्यक्ष जयश्री अनिल गेडाम, सहसचिव अनिल गेडाम व किशोर कुमरे, कोषाध्यक्ष देवेंद्र मडावी, संघटक परमेश्वर उईके, महिला संघटक सपना कुसराम, कार्याध्यक्ष विठ्ठल इरपाते आणि मार्गदर्शक रामदास एडसकर यांची निवड करण्यात आली.
सभेत आदिवासी समाजाशी संबंधित विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले. यामध्ये पदवीधर शिक्षक आमदार निवडणुकीबाबत संघटनेची भूमिका, आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे महामोर्चाचे आयोजन, बोगस जात प्रमाणपत्रधारकांवर कारवाई करून पात्र आदिवासींना न्याय मिळवून देणे, बिंदूनामावलीतील अन्यायकारक बदल दुरुस्त करणे, मेडिकल प्रवेशातील बोगस प्रकरणांवर कारवाई करून पात्र आदिवासी विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणे तसेच अनुसूचित जमातीच्या रिक्त व प्रलंबित जागा तात्काळ भरणे आदी विषयांचा समावेश होता.
याशिवाय आदिवासी कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर तसेच समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आगामी आंदोलनांबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती इंदिरा आडे, जयश्री गेडाम, सपना कुसराम, ममता मडावी, विजय मेश्राम यांच्यासह उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील बहुसंख्य सभासदांनी उपस्थिती लावली.
“प्रतिक्रिया“
” दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘उलगुलान महामोर्चा’मध्ये उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे”
मा. सुरजलाल येल्ले
विभागीय अध्यक्ष, एम्प्लॉईज फेडरेशन



