ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननांदेडमराठवाडासाहित्यगंध
आम्ही मराठी आहोत काय?
बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0
5
1
7
8
7
आम्ही मराठी आहोत काय?
सणवारांची मांदियाळी
संस्कृतीचा ठेवा महान
साजरे करतो सण आम्ही
ठेवून आपल्या परंपरेची जाण
शिक्षणाने सुधारलो आम्ही
विज्ञानाने केली आमची प्रगती
मराठी रितीभातीचा ऱ्हास नको
स्वतः करु नको अधोगती
मराठी मराठी गजर नसावा
कृतीतून तिचे करु संगोपन
आचारविचारातून समृद्धता
अजून वृद्धिंगत करुया आपण
मायबोलीचे पाईक आपण
विदेशी भाषेचे रोवतो पाय
खेदाने म्हणावेसे वाटते
आम्ही मराठी आहोत काय?
विदेशी भाषेचा द्वेष नसावा
मायबोलीचा करुया जागर
आम्ही मराठी आहोत काय?
या प्रश्नाला देऊ उत्तर
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
5
1
7
8
7



