चला जाणून घेऊया..!! आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास!
डॉ.अविनाश प. परांजपे. रचना आनंदवन सोसायटी वानाडोंगरी, जि. नागपूर

चला जाणून घेऊया..!!
आपल्या लाडक्या बाप्पाचा इतिहास!
श्री गणेशाने म्हणजेच आधी आपण उल्लेखित करीत असलेल्या वक्रतुंड नंतरचा गजवदन याने आपल्या प्रत्येक 21 गजानन कार्यकर्त्यांच्या गटाला गण असे नाव दिले आणि एकेकागणाला एक एक ग्राम म्हणजे म्हणजेच गाव किंवा नगर येथे शिक्षक रूपाने पाठविले. त्याकाळी शिक्षकी पेशा हा प्रामुख्याने ब्राह्मण समुदाय करीत असल्यामुळे ग्रंथांमध्ये ब्राह्मण रूपाने असा उल्लेख आहे. सर्व जंबुद्वीप भर या गणांना पसरवून त्यांनी नेमणूक झालेल्या प्रत्येक गावागावात लोकशिक्षण सुरू केले, तसेच प्रत्येक गजाननाने त्रिशूल बाळगणे सक्तीचे केले . या फाटक्या शिक्षक लोकांकडून आपल्याला कसला धोका, या समजुतीत विघ्नासुर व त्याचे क्रूर शासक ग्रामप्रमुख गाफील ठेवल्या गेले. या गजाननानी म्हणजेच गणांनी त्या त्या गावातील लोकांना सर्व शास्त्रांचे व शस्त्रांचे प्रशिक्षण दिले; म्हणूनच समस्त जनता त्यांना विद्यादाता म्हणून ओळखू लागली.
त्या समयी समस्त गणांकडून ज्यावेळी जनतेच्या सर्व तयारीची ठाम बातमी आली, त्याच वेळेस एक समवच्छेदे करून म्हणजे एकाच वेळी संपूर्ण जम्बुद्वीपात त्या क्रूर, विघ्नसुर विरोधी क्रांतीचा उठाव करण्यात आला. समस्त गण व जनतेच्या कोट्यावधी सशस्त्र प्रतिकारापुढे विघ्नासुराच्या सर्व सेनापती सर्व ग्राम प्रमुख आणि त्यांच्या सेनेचा पाडाव झाला. विघ्नासुरास स्वतः श्री गणेशाने स्वहस्ते युद्ध करून त्याचा वध केला. तेव्हापासून श्री गणेशा विघ्नहर्ता, विघ्ननाशक अशी संबोधने प्राप्त झाली. या न भूतो न भविष्यती, अशा विजयानंतर समस्त जनतेने श्री गणेशास सिंहासनावर बसवून त्याला अभिषेक केला. तोच दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा. तेव्हा ज्या प्रजेला प्रत्यक्ष अभिषेकाला जाणे शक्य नव्हते,त्यांनी श्री गणेश प्रतिमेला मृत्तिके पासून स्वहस्ते बनवून, प्रतिमाच घरगुती सिंहासनावर बसून त्यास अभिषेक केला तीच प्रथा आज आपण परंपरेने पाळत आलो आहोत.
सिंहासनाधीश्वर बनलेल्या श्री गणेशाने यानंतर पहिले काम केले ते म्हणजे लोकशाही स्थापन करण्याचे. त्या त्या ग्रामातील लोकांवर दंडेलशाहीने व धनदांडगेपणाने राज्य करणाऱ्यांची हकालपट्टी करून, त्या त्या ग्रामवर ग्रामातील लोकांनी, ग्रामसभेने निवडून दिलेला प्रतिनिधी गावावर शासन करेल. अशी संरचना केली तो प्रतिनिधी पुढे मागे मदांध होऊन त्यांना त्रास देऊ नये याची जबाबदारी त्या त्या ग्रामातील गजाननाच्या गणप्रमुख असलेल्या गजमुखवर ठेवण्यात आली. चुकून माकून एखादा गण प्रमुख मातला, तर त्याची तक्रार गणनायकाकडे करण्याची व्यवस्था केली . याच प्रकारे शासन व्यवस्था क्रमाने विनायक, गणाधीश, गणपती, गणाध्यक्ष, यांचे नंतर स्वतः श्री गणेश यांच्यापर्यंत जनतेस आपल्या तक्रारी गा-हाणी नेता येऊ लागल्या. जर कोण्या जनतेस चोरा चीलटांचे भय वाटले, किंवा कोण्या लुटारू गुंड प्रवृत्तीच्या माणसाने भय दाखवले, तर त्याने फक्त गजाननाकडे जावे मग काही काळजी नाही.
गजाननाचा गण आपले संकट शंभर टक्के निवारण करेल ही खात्री जनमानसातील निर्माण झाली. श्री गणेशाने आपल्या गणास दिलेले हस्तीमुख म्हणजेच गजाचे आनन, गजानन हे देखील जनतेत अतिशय प्रिय झाले. त्यामुळे घरी कोणतेही कार्य असो समारंभ असो तो विना संकट पार पाडायचा असल्यास पहिले आमंत्रण श्री गजानना द्यावे. मग शांतपणे सर्व चांगले पार पडते. हा विश्वास निर्माण झाला त्यातूनच सर्व देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान श्री गणेशास प्राप्त झाला आणि त्याला प्रथमेश संबोधले गेले. गणेशाने स्थापित केलेल्या व्यवस्थेनुसार समस्त जंबुद्वीपावर पुन्हा शांततेचे व सुखाचे राज्य सुरू झाले. परंतु स्वतःला राजा किंवा सम्राट पद घेऊन त्याचा उपभोग घेण्याचे गणेशाने अमान्य केले. त्यात जम्बुद्वीपाचे शासन करण्यास सोयीचे जावे म्हणून गणेशाने 21 विभाग तयार केले प्रत्येक विभागास जनपद म्हणून मान्यता दिली. हे 21 विभाग त्या त्या क्षेत्रातील लोकांची भाषा, संस्कृती, परंपरा, याचेनुसार बनविले गेले. ते येणेप्रमाणे! एक अंग, दोन वंग, तीन कलिंग, चार अश्म, पाच अवंती, सहा चेदी, सात गांधार, आठ कंबोज, नऊ काशी, दहा कोसल,11 कुरू, बारा मत्स्य, तेरा मगध,14 मल्लव,15 पांचाल, 16 सुरसेन,17 ब्रिजी,18 वत्स 19 विदर्भ, 20 किरात, 21नाप्रद. या सर्व जनपदांचे कार्य तेथील लोकनियुक्त प्रमुखांनी करावे, व त्यांना सहाय्य गजाननाच्या गणाने करावे असा नियम केला. त्यामुळे या जनपदांना लोक गणराज्य असेही संबोधू लागले. आणि अशा प्रकारे बुद्धिमान गणेशास लोक दैवत म्हणून पुजू लागले.
श्री गणेशाच्या या पद्धतीचा जगातील इतर सर्व भागांमध्ये संदेश गेला आणि गुगल वर पहाल तर ग्रीकपुराणात त्याचा उल्लेख ‘इनिशियेशन ऑफ डेमोक्रसी इज अँड इंडियन बेबी’ असा करण्यात आला. त्याचबरोबर श्री गणेश प्रतिमेला ग्रीक देवतांमध्ये स्थान देण्यात आले याचा पुरावा तेथील उत्खननात चौथ्या पाचव्या शतकात आढळतो. बौद्ध वाङ्मयात महायाना सूत्रतही उल्लेख आढळतात. चिनी बुद्धिस्ट एन सायक्लोपीडिया याच्यानुसार गणेशा ओन्ली हिंदू गॉड रिगार्डेड बोधिसत्व असे म्हटले गेले. जैन देवतात ही केनो निकल लिटरेचर मध्ये, जैन देवतांमध्ये श्री गणेशाची प्रतिमा सापडते. जगातील सगळ्यात जास्त मुस्लिम बहुल देश म्हणजे इंडोनेशिया हा मानला जातो त्यांच्या चलनी नोटेवर देखील श्री गणेशाची प्रतिमा आहे.
बघा आहे ना..!! आपला बाप्पा सर्वधर्मी देव? या बाप्पाचा इतिहास यापुढे असा आहे की 21 जनपदांच्या स्थापनेनंतर श्री गणेश हिमालयात ज्ञान समाधी लावून तपस्थ झाले. इकडे हळूहळू सर्व जनपदातील गजाननांचीची वये वाढल्याने, आणि हळूहळू वृद्धावस्था आल्याने किंवा निधनाने त्यांची संख्या कमी होत गेली. गणसंख्या कमी होऊ लागल्याने त्या जनपदांचे सत्ताधीश शासक उन्नत होऊन जुमानी नासे झाले. त्यातून पुनश्च राजे महाराजे तयार होऊ लागले. त्यांची आपापसात युद्ध होऊ लागली. यातूनच पुढे महाभारताचे युद्ध होऊन सर्वनाशापर्यंत मजल गेली. समाधीस्थ गणेशास जागृत करून त्यांचे गुरु श्री महर्षी व्यास यांनी त्यास आपली गुरुदक्षिणा मागितली. श्री गणेशांनी आपणास काय देऊ? असे विचारताच व्यासांनी महाभारताचा जय नावाचा इतिहास अजरामर करावयाचा असल्याचे सांगितले. तत्पूर्वी लेखन कला अस्तित्वात नव्हती. पाठांतराणे मुखोद्गत केल्यावरही पुढील पिढ्यांपर्यंत हा इतिहास नीट पोहोचला पाहिजे. तेव्हा अपरिमित बुद्धिमान गणेशाने लेखन कलेचा, अक्षर लिपीचा शोध लावला.
तदनंतर ज्या वेगाने महर्षी श्री वेदव्यास इतिहास सांगत, त्याच वेगाने श्री गणेशाने तो लिहून काढला. अशा प्रकारे गुरुदक्षिणा दिल्यावर आता आपले जीवित कार्य संपले म्हणून श्री गणेशाने जलसमाधी घेतली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध चतुर्दशी. म्हणून जनतेने भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी असे दहा दिवस जनतेने श्री गणेश प्रतिष्ठापना करून, पूजन करून शेवटचे दिवशी विसर्जन. असा महोत्सव साजरा करणे सुरू केले. अशा आपल्या श्री गणेशाचा इतिहास समस्त जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून माझा लहानसा प्रयत्न यश श्री गणेशाचे! त्या माझ्या चुका असल्यास त्याबद्दल क्षमाप्रार्थी.
डॉ.अविनाश प. परांजपे.
रचना आनंदवन सोसायटी
वानाडोंगरी, जि. नागपूर
=======



