Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

तीनविरा – वाघोली -वाघ्रण रस्त्याची दुर्दशा

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

तीनविरा – वाघोली -वाघ्रण रस्त्याची दुर्दशा

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

रायगड: जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या तीनविरा – वाघोली – वाघ्रण या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे. रस्त्यास खड्डेच खड्डे पडले आहेत . डाँबरी स्तराचा अंश उरलेला आहे. पादचारी व विद्यार्थ्यांना त्रास भोगावा लागत आहे. वाहनचालकांना खड्डे चुकविण्यासाठी मोठीच कसरत करावी लागते . त्यामुळे छोटे – मोठे अपघात होतात . जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवटअसल्यामुळे जाब कोण विचारणार ?

तीनविरा – वाघोली – वाघ्रण हा खारेपाटातील गावांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. वडखळ -अलिबाग राष्ट्रीय महामार्गावरील तीनविरा येथे या रस्त्याची सुरूवात होते व कार्लेखिंड – रेवस
या मुख्य रस्त्यास वाघ्रण येथे मिळतो. कार्लैखिँडमार्गे रेवस ऐवजी तीनविरा – वाघोली – वाघ्रण या रस्त्याने रेवस बँदराकडे गेल्यास ७ कि. मी. अंतर वाचते शिवाय , वेळ व इंधनाचीही बचत होते . म्हणून पेण – पोयनाड कडून रेवससकडे जाणारी वाहने तीनविरा – वाघोली – वाघ्रण या रस्त्याचा पर्याय निवडतात.

परिणामी या रस्त्याने सतत वाहतूक चालू असते. शिवाय या रस्त्याने वाघोली , सिद्धार्त नगर
(वाघोली , ) विरवाडी , सुतारपाडा , लेभी , खिडकी , कोपर , भायमळा , बहिरमपाडा , कामार्लै , लोणघर , सातघर , वाघ्रण ही गावे जोडली गेली आहेत .

सदर रस्ता खारेपाटातील अनेक गावांचा संपूर्क रस्ता आहे . सततच्या वाहनाँच्या : वरदळीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रवाश्यांना सांधेदुखी , मानदुखी , पोटदुखी , ह्रुद्विकार इ. आजार उद्भवले आहेत . जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट असल्यामुळे सर्वत्र अधिकारीवर्गाचेच साम्राज्य पसरले आहे. म्हणून जनसामान्यांची कीव जाणून घेऊन सदर रस्त्यास प्राधान्य द्यावे व खड्डेमुक्त प्रवास करावा अशी विनंती ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर करीत आहेत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे