ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध
महिला दिन
0
4
8
2
8
6
महिला दिन
एकच दिवस आहे 8मार्च
वर्षातून येतो कीं, त्या दिवशी,
महिला दिन साजरा होतो
एरवी, वाटते ती नको नकोशी.
तिच्या कार्य कर्तृत्वाचा
सन्मान पुरस्काराने करतात,
एरवी चूल, मुल ओळख तिची
प्रतारित मात्र सदैव करतात.
हार फुले प्रमाणपत्र देवून
गौरव पुरुषी संस्कृती करते,
मागाहून तिचे उणे दुणे
सांगून मनोरंजन होते.
आई, ताई,बाई,होऊन सर्वांची
जवाबदाऱ्या हसून पेलते,
प्रसंगी जिजाऊ सावित्री होऊन
अन्यायाचा प्रतिकार करते.
डॉ आंबेडकरांनीं दिली समानता
हिंदूकोड बिल लिहून,
गुलामीतून केली मुक्तता
भारतीय संविधान लिहून.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
8
6



