कवितादादरा नगर हवेलीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
रानोरानी; सुजाता सोनवणे
0
4
8
2
8
4
रानोरानी
वृक्षतोड करून मानवाने
गाठला अमानुषतेचा कळस
बघ ना आई तरीही
रानोरानी बहरला पळस.
रानीवनी पानोपानी बहरला
पिवळाधम्मक बहावा
बघ ना किती सुंदर
तो निसर्गाचा देखावा.
वैशाखाच्या रणातही
लाल केशरी गुलमोहर
अंगोपांगी बहर पाहता
शोभून दिसतो परिसर.
निसर्गाचं मनोहर रूप
पाहून पक्षीही आनंदी
आम्रवृक्षी तरूवेलींवर
फिरती मस्त स्वच्छंदी.
बघ ना गं आई हा
माणूसच का असा
भरभरून दान देणाऱ्या
निसर्गाला विसरतो कसा.
सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली
=========
0
4
8
2
8
4



