Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

माणूस म्हणावं का?

भूमेश्वरी सातपुते (खोंडे) ता. उमरेड, जि. नागपूर

0 4 8 2 9 0

माणूस म्हणावं का?

बाळ भुकेला पण पान्हाच आटला
तिला माता म्हणावं का ?
जन जन भुकेला पण हातच आखडला
त्याला दाता म्हणावं का ?

शिष्याची नाही चिंता
त्याला शिक्षक म्हणावं का ?
कुंपणच खात शेत
त्याला रक्षक म्हणावं का ?

मुलासाठी मुलीचा घेतो जीव
त्याला पिता म्हणावं का ?
प्रजेची नाही कीव
त्याला नेता म्हणावं का ?

हुंड्यासाठी अबलेचा जातो जीव
त्याला पत्ती म्हणावं का ?
जिथे रोज होतो बलात्कार
याला नीती म्हणावं का ?

ज्यात नाही दाना
त्याला कणस म्हणावं का ?
माणुसकीच विसरला
त्याला माणूस म्हणावं का ?

भूमेश्वरी सातपुते (खोंडे)
ता. उमरेड, जि. नागपूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे