0
4
8
2
9
0
एक धागा सुखाचा
दुःखाच्या जरतारी वस्त्रात
एक धागा सुखाचा शोधते
नित्य नव ऊर्जा मीच माझी
स्वप्नाचा नवा झोका बांधते….!!
शेवाळावर प्रवास करताना
पायाचा घट्ट नेम मी सांधते
कन्या माय बापाचा सन्मान
म्हणून इंगळावर मी नांदते…!!
अद्भुत शिल्प घडवणाऱ्या
जन्मदात्यांना नित्य वंदिते
त्यांचे सुखाचे सूत्र आगळे
पुन्हा पुन्हा कृत्यात गोंदते…!!
काळजातल्या आठवणींना
एकांतात एकटी मी खांदते
पापण्यातील वळीवाला मी
झाकूनी सणोत्सवास रांधते…!!
एक धागा सुखाचा कधी
शेकडो परस खोल शेंदते
हार कदापि मानणार मी
म्हणून आयुष्याशी झुंजते…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
=======
0
4
8
2
9
0



