शिवरायांचा मल्हारगड दुमदुमला सिंहगर्जनेने
वसुधा नाईक, प्रतिनिधी
शिवरायांचा मल्हारगड दुमदुमला सिंहगर्जनेने
वसुधा नाईक, प्रतिनिधी
“इस देश की रक्षा कौन करेंगे
हम करेंगे हम करेंगे !!”
पुणे: युवाक्रांती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातून 50 प्रमुख पदाधिकारी, सदस्य कुटुंबियांसह उपस्थित होते. या मेळाव्यात शिवरायाची आरती, महादेवाची तसेच गणरायाची आरती करण्यात आली. माऊली जिजा व शिवरायांचा जय जयकार करण्यात आला. वृक्षारोपण करण्यात आले. स्वच्छ भारत संकल्पनेचा सक्रिय प्रसार करण्यात आला.
मेळाव्याचे सर्व प्रतिनिधी उत्स्फूर्तपणे ट्रेक करुन मल्हारगड येथील युवा क्रांती मेळाव्यात सहभागी झाले. युवा क्रांतीचे राष्ट्रीय सल्लागार डाॅ.राजेश्वर हेन्द्रे , पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीराव शेलार, अध्यक्षा अमृताताई पठारे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला अध्यक्ष सौ.वसुधा नाईक, सौ.पल्लवी वाघ,अंकुश आगरकर, वैशाली बांगर, वर्षा नाईक, आप्पा गायकवाड इत्यादी पदाधिकारी हजर होते. तसेच आंतरराष्ट्रीय विचारवंत, कलावंत आणि साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर आदि मान्यवरांनी मेळाव्यास मौलिक मार्गदर्शन केले.
डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित
डहाळी अनितकालिकाच्या विश्वविक्रमी 571व्या अंकाचे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी गोड बोलणा-यांना मिठुमिठूपोपट पुरस्कार तर काही हस-या मंडळींना हाहाहा लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस प्रदान केले. अमृताताई पठारे यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्यातून एक संदेश असा देता आला की गडावर साफसफाई ठेवावी. कोठेही घाणं करू नये. एकोफ्यातून कोणतेही कार्य सिद्धीला नेता येते.



