
0
4
0
9
0
3
समजून घेताना
मी कुठे कमी पडलो
समजून घेताना तुला
गोफ प्रेमाचा उसवला
तुझ्या माझ्यात गुंफलेला
जे आवडत होते तुला
ते नकोसे का जाहले
कालचा तू आज कोठे?
असे तिला प्रश्र्न पडले
मी तुला पुरते ओळखले
शब्दांचे तारे तिने तोडले
पायी घालतोस तू बेडी
प्रेमात होते वेडी झाले
जी गंधाळलेली फुले
केसात होती माळली
आज निर्माल्य त्यांचे
उडून गेले हो वावटळी
जीवनात असेच होतसे
भरतीस किनाऱ्या लाटा येती
क्षण काळ काही सरता
नात्यात येते का ओहोटी?
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जिल्हा सांगली
0
4
0
9
0
3





