Breaking
कविताचारोळीपरीक्षण लेखबीड

ऋणगंधित भाव मनाचे… शब्दपुष्प कृतज्ञतेचे; राजश्री ढाकणे

0 6 2 8 1 0

ऋणगंधित भाव मनाचे… शब्दपुष्प कृतज्ञतेचे; राजश्री ढाकणे

“तुमचा फोटो पाठवा*
तीन शब्दांत जादू अपार
सर्वोत्कृष्ट चारोळी सन्मान
मनी हर्ष होतो फार फार..!”

सर्वांना सस्नेह वंदन. काल दिनांक २३-०९-२०२६ ला माझ्या “चारोळी “रचनेची आजची “सर्वोत्कृष्ट चारोळी रचना “या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत निवडून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम चारोळी प्रशासन समितीचे ऋणाभार व्यक्त करते…!तत्पूर्वी थोडेसे मनात खूप दिवसांचे दाटलेले ऋणभाव. बऱ्याच दिवसांनी अगदी एक महिना झाला असेल बऱ्याच वेळा दादांनी माझ्या लेखणीचा सन्मान केला, पण ऋणगंध तसेच मनात दाटून राहिले. काहीना काही अडचणी येत राहिल्या आणि मी माझे मनोगत लिहू शकले नाही याची मला मनोमन खंत आहेच. दादा आणि सर्व परीक्षक टीम, शिलेदार परिवार मला नक्की समजून घेईल अशी आशा बाळगते. मी जाणून बुजून माझ्या शिलेदार परिवारासोबत असे कधीच वागणार नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..असो

“तुमचा फोटो पाठवा” हाच तो तीन शब्दांचा जादुई मेसेज जेव्हा दादांचा येतो ना… काय तो अवर्णनीय आनंद गगनात मावत नाही… आनंदाचा बार मनातल्या मनात उडून एक स्मित हास्य चेहऱ्यावर पसरतं..ती सकाळ निदान माझ्यासाठी तरी माझ्या जीवनातील सुवर्ण प्रभात असते. आयुष्यातील अविस्मरणीय आनंदी क्षणात सर्वात एक नंबर असतो… त्या दिवशी वेगळीच ऊर्जा लेखणीत संचारते…आणि खरं म्हणजे या आनंदाची चाहूल माझ्या अंतर्मनाला आधीच लागलेली असते.. असं सर्वांच्या बाबतीत घडत असेल कदाचित…! काल सकाळी दादांचा मेसेज आला पण सकाळी शाळेला जाण्याच्या धावपळीत मोबाईल बघितला नाही पण गाडीत बसल्यावर पहिल्यांदा जादूई मेसेज आहे का बघितले तर तो दिसला आणि मी लगेच फोटो पाठवला.

आता विचार करू लागले की, नक्की कोणत्या रचनेची निवड झाली असेल हायकू, त्रिवेणी की चारोळी..!.. शोध मोहीम सुरू झाली आणि चारोळीचे भले मोठे पोस्टर दिसले तो क्षण माझ्यासाठी अवर्णनीय असाच ठरला. पोस्टर वरची चारोळी माझ्या सवयीप्रमाणे मी पुन्हा वाचली आणि मला ती जरा जास्तच आवडू लागली. तोपर्यंत अभिनंदन वर्षाव सुरू झाला आणि त्या आनंदात मन आनंदाने चिंब चिंब झाले.

“घडविले शिल्प माझे
आई वडील नि गुरूंनी
माझ्या जीवनाचे तेच
आहेत खरे पारसमणी”

हीच ती चारोळी होती सर्वोत्कृष्ट पोस्टरमध्ये झळकत होती आणि संपूर्ण शिलेदार परिवाराच्या प्रेरणादायी अभिनंदनीय पुष्पवर्षावात चिंब चिंब भिजली होती. खऱ्या अर्थाने मला घडवणारे माझे आईवडील आणि सर्व गुरूंचा हा सन्मान आहे.. ही चारोळी त्यांच्या चरणी समर्पित आहे..!

आता वेळ ऋणाभाराची….
सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा लाखो व्यक्तींना साहित्यिक बनवणारे…सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारे, ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी प्रिय सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, प्रिय स्वाती ,प्रिय वृंदाताई,शर्मिला ताई,तारकाताई, प्रतिमा ताई… साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ… अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद. माझ्या लेखणीवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव करणारे… अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद…!…सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!!

राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 1 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे