
0
6
2
8
1
9
मनसंवाद
साधावा कधीतरी मनसंवाद
मनातल्या मनात मनाशी
उफळून येतील उर्मी
ज्या साचल्यात तळाशी
कितीदा आपण अव्हेरले
सोडली न त्याने संगत
मन मारून आपले
राहिले ते तरी सोबत
परिस्थितीशी करत मुकाबला
मी झुंजत राहिलो
अंतर्मनी करून विचार
ते एकटेच झुरत राहिले
प्रत्येक वेळी मी त्याला
गृहीतच होते धरले
ते मात्र निमूटपणे
सर्वकाही सोसतच राहिले
साधता संवाद तयाशी
ते इतुकेच बोलले
गड्या आता वेळ संपली
विचार तुझे आता
माझ्या अंगवळणी पडले
बी.आर.पतंगे
जिल्हा अहिल्यानगर
0
6
2
8
1
9


