0
4
8
2
9
0
अंतर्मन
सगळ्यांच मन मी जपले
माझं कुणी जपलच नाही
मी अपले म्हणत होते
मला कोणी अपल म्हणलच नाही ……
माझ्या अंतर्मनाला प्रश्न केला
काय मी गुंन्हा केला
चांगुलपणाची शिक्षा जर
दुःख असेल तर
जगायचं कसं ते तूच शिकव
सगळ्यांच मन मी जपले
माझं कुणी जपलच नाही…….
प्रत्येकाच्या अडचणीत मी
खंबीरपणे उभी असते
माझ्या अडचणीत मी
एकटीच का असते
असे आहेत अनेक प्रश्न
मनात याच उत्तर
आहे फक्त अंतर्मनात……
सगळ्यांच मन मी जपले
माझं कुणी जपलच नाही
मी अपले म्हणत होते
मला कोणी अपल म्हणलच नाही
श्रीमती कल्पना सुरवसे
उमरगा जिल्हा धाराशिव
=========
0
4
8
2
9
0



