
0
4
8
3
0
0
साखरपेरणी
प्रत्येक शब्दात तुझ्या
आई असे साखरपेरणी
तुझ्या मुखी नसते कधी
द्वेष, मत्सर, उणी, दुणी
कर्तव्यात ना कसूर करीत
झिजतेस तू कुटुंबासाठी
काटकसर तुझी असे सदैव
मुलांच्या सुखी भविष्यासाठी
रागातही तुझ्या गोडवा
वात्सल्य आणि जिव्हाळा
तुझ्यामुळे घराला घरपण
जपतेस तू सारा गोतावळा
साखरपेरणी दुज्यासाठी
शेजाऱ्यांशी सलोखा तुझा
नातेसंबंधातही आपलेपणा
असा प्रेमळ स्वभाव तुझा
प्रतिमा नंदेश्वर
ता.मूल जि.चंद्रपूर
========
0
4
8
3
0
0



