0
4
8
2
9
0
बहर
फुलेल का बहर नवा
सख्या माझिया जीवनी
भेटते इथे रोज मजसी
गीतांची अशी विराणी
माझ्यासाठी होसी श्रावण
बरसशी रिमझिम रिमझिम
आषाढी रे कोसळताना
भिजविसी माझे रोमरोम
मृग सरला सरे श्रावण
अता कशाचे बहरून येणे
भूमी नभास बोले सखया
भेट आपुली अता न होणे
तुझ्या भेटीची ओढ मजला
समजून घे ना तू वेल्हाळे
कवेत घेता तुला साजणी
टिपूर चांदणे हे गंधाळे
नाते आपले युगायुगांचे
जाणशील ना तू भूराणी?
रोजच असे ऋतू प्रेमाचा
बहर अंगांगी, प्रेम दिवाणी
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
0



