‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : पळती झाडे📘*
*🔸मंगळवार : ०१ /सप्टेंबर /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*पळती झाडे*
पळती झाडे
पाहू या
मामाच्या गावाला
सारे जाऊ या ॥१॥
झुकझुक गाडी
धुरांच्या रेषा
हवेत दिसती
किती सुंदरशा ॥२॥
सुट्टीची मजा
लुटु या
घेऊन उंच झोका
ढगावर जाऊ या ॥३॥
भिंग भिंग भिंगरी
फिरवू या
चंग चंग
चंगळ करू या ॥४॥
फिर फिर फिरवू
घेईल गिरकी
मारून उडी
सरकेल फिरकी ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
शाळेला होती सुट्टी,
मजा करू भारी,
मुले आम्ही हट्टी,
फिरायला जाऊ सारी!
लाल पिवळी गाडी,
चढायला मोठी शिडी,
ड्रायव्हर काका छान,
हुशार मित्र समान!
गाडी सुरू झाली,
भोंगा वाजला मोठा,
पळती झाडे दिसली,
वाटला अचंबा मोठा !
झाडे पळू लागली,
गाडीला धरू लागली,
सोबत आम्हा येऊ द्या,
हट्ट करू लागली!
मुले काकांना विचारती ,
झाडे का बरे पळती?
काका म्हणाले हसून,
ही गंमतच असती!
झाडे उभी जागी,
गाडी पळे वेगाने,
भास हा डोळ्यांचा,
खेळ हा वेगाचा!
आपण जाऊ पुढे,
मागे जाई नजारा,
ही असे ‘ सापेक्ष गती ‘
झाली ज्ञानात प्रगती !
गोष्ट कळली आता,
ज्ञान वाढले आमचे ,
पळत नाही झाडे ,
आपण पळतो खरे !
*सौ. सुमन विजय शेवाळे*
*जिल्हा नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पळती झाडे*
गाडी पळते भरभरभर
पळती झाडे झरझरझर
शीटी वाजे सू§§§§§
आवाज येतो खडखडभर
भासमान हे दृश्य असे
झाडे जागी स्थिर वसे
गाडी जेव्हा पळते तेव्हा
झाडे मागे पडत असे
मौज मात्र वाटते मनी
पळणारे झाडे पाहुनी
चैतन्याने मन भरवी
अशी किमया निसर्गातुनी
पुढे पुढे निघते गाडी
झाडांना मागे सारत
बस असो वा आगगाडी
दृश्य मनोहर हे दिसतं
निसर्ग अपुला सोबती
लावू झाडे खुप खुप
पळणा-या झाडांचे पाहू
दिव्य मनोहर रूप रूप
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
काकांच्या गावाला जाऊया
बसमधून सहल करूया
खिडकीतून बघूया
पळती झाडे पाहूया
काका आमचा शेतकरी
काकू करे मस्करी
तूप रोटी खाऊया
काकाच्या गावाला जाऊया
काकाचा मुलगा असे चिंटू
काकाची मुलगी असे मिंटू
चिंटू,मिंटूसी गोष्टी करूया
आपण गाली हसूया
काकाचे गाव सुंदर
घर असे टुमदार
घरात आम्ही राहूया
गंमत जमंत करूया
गावालगत असे नदी
नदी किनारी जाऊया
नदीत आम्ही पाहूया
मैत्री आपण फुलवूया
बसमधून जातो आम्ही
पळती झाडे दिसे हिरवी
झाडांशी आपण बोलूया
वार्यासंगे डोलुया
काकू आमची सुगरण
करे पुरण पोळीचा पाहुणचार
पुरणपोळी खाऊया
आजीच्या गोष्टी ऐकूया
*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
गाडी लागली पळायला
झाडे पण लागली पळायला
चिंटूनी म्हटलं ए थांबा थांबा
झाडोबा का पळता लांब लांब
आंबा म्हणाला नाही पळत
आम्ही तूच पुढे पुढे सरकते
चिंच म्हणाली हसत हसत
भरभर करत गाडी पळते
खिडकीतून चिंटू बघत होता
झाडे मागे मागे पळत होती
शेत, घर, डोंगर सारेच कसे
माझ्याशी लपंडाव खेळत होती
आई म्हणाली चिंटू बाळा
झाडे नसतात रे पळती
गाडी आपली पुढे धावते
म्हणून जग मागे सरकती
मी हसले, झाडं पण हसले
गाडी पण खळखळ हसली
पळती झाडे पाहतांना
मला खूप खूप मजा आली
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
पळती झाडे धावती वेगात
कुठे चालतील सांगा बरं
वाऱ्यासंगे खेळायला, नाचायला
आनंदाने त्यासवे बगडायला…
आंब्याचे झाड पुढे, पुढे धावले
पेरूच्या झाडाने शर्यत लावली
कडुलिंब म्हणतो, “मीही येतो,”
करवंद झाडे म्हणाली आम्ही गाणी गातो…
पानापानांची टाळी छान वाजली
फांद्या डोलू लागल्या जसा झुला
पक्षी म्हणती, “थांबा जरा ना”
पाडू नका रे आमचा घरकुला…
फुलपाखरू फुलांमागे धावले
भुंगा गुणगुण गायला लागले
सारीच झाडे जेव्हा धावू लागती
रानेच राने थाटात नाचती…
पाऊस आला सरसर सरसर
सगळी झाडे ओलीचिंब झाली
थेंबांचे मग मोती घेऊन
पाने चिडीचूप्प भोळी बनून..
सांजसमयी झाडे जागेवर थांबली
चांदणं आले त्यांच्या भेटीला
चांदोबाने हळूच त्यांना विचारले
तुम्ही सारे दिनभर किती छान रमले….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी ,जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
पळती झाडे
धावली भरभर
आला पाऊस
सर सर सर
सो सो सो सो
वाहला वारा
वेगात पडल्या
पावसाच्या गारा
टपोरे थेंब
नाचले पानांत
मयुराचे नर्तन
हिरव्या रानांत
झाडांच्या अंगांवर
गारांचा मारा
आनंदी झाला
निसर्ग सारा
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
आई सोबत बाबा सोबत
गावाला जातो आगगाडीत
कधी बस मध्ये बसतो खिडकीतून
बाहेर बघतो सुंदर सुंदर दृश्य
लक्ष माझे कुठेच नसते
बाहेर बघतो नवनवीन
पाट्या वाचतो नवीन माहिती
मिळवतो छान छान
जंगल लागते कधी हिरवे
कधी पिवळे रान दिसते
पळती झाडे दिसतात
सारेच पळत असतात
मला माहित आहे
झाडे पळत नसतात
घरं इमारती पळत नसतात
मीच वेगाने पुढे जातो
तरी किती छान असते
वळणावळणाने कधी सरळ
कधी डोंगर दर्या मधून
आपण जात असतो
ही पण एक सहल
असते गावाला तर गावाला
पण माहिती मिळते मला
मजा वाटते किती बरे
*गजवंती सुभाष विघ्ने*
*बडनेरा ,अमरावती*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
झुकु झुकु आगगाडी
मामाच्या गावी सोडी
मामा आला न्यायला
जातो मामाच्या गावाला.
खंडाळ्याचा घाट
वळणाची वाट
झुकू झुकू गाडी
नागिनीचा थाट .
इंजिन चाले पुढे
डबे मागे मागे
आवाजाला घाबरून
पळती झाडे मागे .
मामाच्या बागेत
पिकलेल्या केळी
मामीच्या हातची
शिखरण पोळी .
आजोळचे अंगण
नातवांची पंगत
आजीच्या गोष्टीला
चांदण्याची संगत.
*सौ विमल धर्माधिकारी*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
झाड म्हणाले, “धावू या!”
वारा म्हणाला, “थांबू या!”
झाड पळाले सुसाट,
पानं पडली पटापट!
चिमणी म्हणे, “अरे थांबा!”
झाड म्हणे, “तू आधी धांबा!”
फांदी गेली डावीकडे,
पाने गेली उजवीकडे!
आंबा म्हणे, “मी राजा!”
केळं म्हणे, “मी ताजा!”
दोघे धावले शर्यतीत,
केळं पडलं धप्पकन मातीत!
वारा हसला खळखळून,
ढगही आला लोळून!
सगळी झाडे हसत म्हणती,
“धावण्याची मजा भारी होती!”
बाल म्हणाले टाळ्या वाजवून,
“झाडे पळती कशी गं धावून?”
आई म्हणाली हसत-हसत,
“स्वप्नातच रे, वेड्या, दिसत!”
*मनोज परसराम शिंदे*
*ता पालम जिल्हा परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
लागल्या आता सुट्ट्या
मामाच्या गावची ओढ
मला खायला भेटतील
आंबे तेही गोड गोड
केली आईने तयारी
घातली नवी कोरी साडी
बाबांनी दारात आणली
पुसपास करून गाडी
खिडकीजवळ बसायला
नेहमीच असतो मी हट्टी
ताईला आला गुस्सा
तिने घेतली मग कट्टी
मग सुरू झाला प्रवास
काचेतून पळती झाडे दिसली
ताईने माझ्या मांडीवर ठेवले ढोपर
अन मुटकन गालात हसली
हिरव्यागार गालिच्यावर
रंगीबेरंगी रानफुले
ती वेगाने मागे सरकत होती
मनात आनंदाचे झुले
पुलाखालून वाहत होता
भरलेल्या नदीचा प्रवाह
गाडी संथ झाली आमची
आला आला मामाचा गाव
*डॉ. संजय पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
मामाच्या गावाला जायची,
हौस लय भारी वाटायची..
झुकझुक गाडी पळायची,
खिडकीची जागा धरायची..
रुळावरून धावते रेलगाडी,
धावती दिसते डोंगर झाडी..
खिडकीतून हळू डोकावून,
पळती झाडे पाहूया वळून..
हिरवी हिरवी झाडे सारी,
रांगेमध्ये दिसायची भारी..
नदी ओढे सारे पळतांना,
खळखळ पाणी वाहतांना..
पाखरे बसलीत झाडावर,
झोके घेतात ती खालीवर..
विणलेल्या घरट्यात छान,
ईवली चोंच,कोवळी मान..
किलबिल होतेय पक्ष्यांची,
वेळ झाली संध्याकाळची..
गाडी पोहचली स्टेशनवर,
झाडे थांबलीत जाग्यावर..
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
पळती झाडे धावती झाडे
वाऱ्याबरोबर फिरती झाडे..!!
हिरवी हिरवी पाने छान
पाहून झाडे हरपते भान…!!
काही झाडे उंच डोंगरावरी
काही नदीभोवती फेर धरी..!!
काही झाडे गावाभोवती
रिंगण करून गोल फिरती..!!
उंच उंच माडाची ती झाडे
निघाली सारी आकाशाकडे..!!
बस असो वा स्कुटर कार
झाडे पळती मागेच फार…!!
थांबा थांबा म्हणाले तरी
पळती झाडे पुढे पळणारी..!!
म्हणती झाडे आम्ही धावू
हिरवळ साऱ्या जगाला देऊ..!!
पळती झाडे करू संवर्धन
होईल जीवसृष्टीचे रक्षण..!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
रुळावरून धावत होती
झुकझुक अगीनगाडी
आल्याड पल्याड होती
उभी हिरवीगार झाडी
मामाच्या गावाला आहे
वळणाची हिरवी वाट
धावत होती गाडी
पार करीत डोंगर घाट
हळूच डोकावली मी
खिडकीतून बाहेर मान
पळती झाडे धावत होती
आमच्या मागोमाग
आईला मग केला प्रश्न
“पळती झाडे चालली कुठे
कुठलं यांच गावं?
जिथे थांबतो प्रवास यांचा
त्या गावाला काय गं नाव?”
हसून आईने दिलं उत्तर.
पळती झाडे बाळा
असतात एकाच ठिकाणी
गाडी धावते पुढे पुढे
त्याला म्हणतात सापेक्ष गती.
उत्तर मिळालं बालमनास
ज्याची उत्सुकता होती
शिकायचं मला शाळेत
नियम नवा सापेक्ष नीती.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
*पळती झाडे*
या मुलांनो सारे या
पळती झाडे पाहूया..
आगीनगाडीत बसू या
झाडां संगे धावूया..
गंमत भारी वाटे मला
पळती झाडे पाहताना..
आनंदाने नाचू चला
सोबत प्रवास करताना..
झाडे पळती भर भर भर
अंग शहारे सर सर सर…
चाकांचा आवाज चर चर चर…
माना फिरती गर गर गर..
गाडी धावे वेगाने
झाडे पळती तावाणे…
थोरा-मोठ्यांचे जे ऐकती
तेच असती शहाणे…..
*सौ संगीता किरण देशमुख*
*बारामती, पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌵🌈🌵➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



