0
4
8
3
0
0
क्षणभर विश्रांती
तू विसाव्याचे ठिकाण
तू श्रमपरिहाराची आस
तुझ्या सान्निध्यात होई
क्षणभर विश्रांतीचा भास
दोन शब्दांचा जिव्हाळा…
सुसह्य करी दुःख उन्हाळा
तगमगलेल्या भूईला जसा
भिजवतो धुंद पावसाळा…
पानगळ येता शिशिराची
त्यासम गळून पडती नाती
निष्पर्ण वृक्षापरि जीवाला
बस तूच एक विसावा कान्हा
अन् क्षणभर विश्रांती राधेची
वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
===========
0
4
8
3
0
0



