Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जे.एस.एम. महाविद्यालय अजिंक्य

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जे.एस.एम. महाविद्यालय अजिंक्य

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जे.एस.एम. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने जेतेपद मिळविले आहे. क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्या वतीने आणि जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग यांच्या सहकार्याने अलिबाग तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धे 2024 चे दि. 21/09/2024 रोजी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड.श्री. गौतम पाटील यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ.सोनाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील विविध वयोगटातील एकूण 8 संघ सहभागी झाले होते. यात 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम सामना जे.एस.एम. ज्युनियर कॉलेज, अलिबाग व पी.एन.पी. ज्युनिअर कॉलेज, अलिबाग यांच्यामध्ये झाला. त्यात जे.एस.एम. ज्युनिअर कॉलेजच्या संघाने 21-07 अशा फरकाने पीएनपी जुनिअर कॉलेजच्या संघावर दणदणीत विजय मिळवला.

तसेच 17 वर्षाखालील मुले व मुली यांच्या गटात सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल, अलिबाग, 14 वर्षाखालील मुलांच्या गटात पी.एन.पी. होली चाइल्ड स्कूल, वेश्वी यांच्या संघाने विजय प्राप्त केला. जे.एस.एम. ज्युनियर कॉलेजच्या संघाचे या यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड.श्री. गौतम पाटील यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या संघाचे प्राचार्या डॉ.सौ. सोनाली पाटील, पर्यवेक्षक श्री. अजय सावंत, क्रीडा शिक्षक श्री.बी.आर. गुरव, क्रीडा समिती सदस्य व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे