
0
6
2
9
0
4
जनमत
जनतेच्या मनात जे मत उमटते
तेच जनमत लोकशाही घडवते
जनमत क्रांतीचा एल्गार असते
भविष्याची दिशा जनमत ठरवते
बळीच्या घामाला मिळावा न्याय
विद्यार्थ्यांची स्वप्ने घेवोत भरारी
कामगारांच्या श्रमा मिळावा मान
जनमत घडवी दुनिया ही न्यारी
नसे कुणाचा दबाव,नसेची भीती
मत मांडणे हक्कची हो प्रत्येकाचा
मान लोकशाहीत हो जनमताला
जनमतची घेतसे कौल सत्याचा
बहुमता सोबत मान अल्पमताचा
न्याय अन्यायाची जाणीव जागती
बळकट करितसे ती लोकशाही
परिवर्तन घडवते जनमत शक्ती
घातक अफवा हो लोकशाहीला
जनमतची जनमानसाचे बिंब
प्रभावी माध्यम जनशक्तीचे
तेच लोकशाहीचे प्रतिबिंब
वृंदा (चित्रा) करमरकर
जि.सांगली
==========
0
6
2
9
0
4



