Breaking
अहमदनगरई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

अशी असावी कविता

डाॅ.नझीर शेख राहाता

0 4 8 2 9 3

अशी असावी कविता

अशी असावी कविता
वाचकांच्या मनाला भुलवणारी॥
वास्तवाच्या झुल्यावर
यथेच्छपणे झुलवणारी॥॥॥॥

अशी असावी कविता
निसर्गाशी जवळीक साधणारी॥
हिरवाईच्या वर्णणाने
सृष्टीशी नाते सांगणारी॥॥॥॥

अशी असावी कविता
दुःखितांचे दुःख जाणणारी ॥
गोर गरीबांच्या व्यथा
शब्दात मांडणारी ॥॥॥॥

अशी असावी कविता
कल्पनेला पंख लावणारी ॥
चंचल मनासारखीच क्षणार्धात
क्षितिजापर्यंत धावणारी ॥॥॥॥

अशी असावी कविता
आपल्या मनाचे गूज बोलणारी॥
आपल्याच भावनांना
अलगदपणे तोलणारी॥॥॥॥

डाॅ.नझीर शेख राहाता
जिल्हा अहिल्यानगर
===≠=====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे