Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

माणसे

गोवर्धन तेलंग पांढरकवडा

0 4 8 3 0 0

माणसे

जीवनी भेटणारे,सारे लबाड झाले।
माणसं कसे काय,अता घबाड झाले।।

कामापुरता मामा,ताकापुरती आजी।
प्रेमाने वागणारे , मित्र नंगाड झाले।।

सुखानं नादतांना,सोबत होतो तरी।
दुःखात पाहूनीया,नजरे आड झाले।।

पाऊस असा येते,योजना धोरनांचा।
पदरी पडताना,नभी भगदाड झाले।।

समाज दुभंगून ,जाती अन धर्मांने।
प्रेम मुळीच नाही,वैरीच गाढ झाले।।

मोकाट राहूनीया,फिरती सैरावैरा।
कळपा कळपात,एकेक सांड झाले।।

कर्जानं राबताना,शेतात मायबाप।
चिंतेत सावकारी,ठिसूळ हाडं झाले।।

सर्वांना सोबतीने,घेऊन चालणारे।
नेतृत्व करणारे,सारथी भ्याड झाले।।

लावून वेड जीवा ,जाते निघून दूर।
पुरवू किती गडे ,नितांत लाड झाले।

भ्रमिष्ट पुस्तकांनी,उध्दार होत नाही।
संविधान वाचून,दुःख पल्याड झाले।।

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे