पत्रकार बळवंत वालेकर “कुलाबा जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
पत्रकार बळवंत वालेकर “कुलाबा जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग (दि.४) रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांची ४५ वर्षांची पत्रकारिता तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दमदार कामगिरी पाहून त्यांना माजी आमदार कै. मधूशेट ठाकूर चॕरिटी ट्रस्ट व आमदार भाई जगताप मित्रमंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदर राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आमदार भाई जगताप व माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सातिर्जे (ता, अलिबाग) येथे करण्यात आले.
श्री . वालेकर सर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हा पासपोर्ट कार्यलय अलिबाग येथे , जिल्हा कामगार न्यायालय अलिबाग येथे तर जिल्हा दूरसंंचार कार्यालय पनवेल येथे आणले,शिवाय सागरगड – माची या वनविभागात वसलेल्या आदिवासी वाडीस रस्ता , वीज , पाणी इ, भौतिक सुविधा मिळण्यासाठी शासनाबरोबर २५ वर्षे झगडून १० एकर जमीन मिळविण्यात यशस्वी झाल्यामुळे हा राज्य स्तरीय पुरस्कार देण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
समारंभाचे आयोजक अॕड .उमेश ठाकूर , श्रीवर्धन चे ननगराध्यक्ष चौगुले , अलिबागचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक , उपनगराध्यक्षा अॕड. मानसी म्हात्रे , जिल्हा काॕंग्रेस ज्येष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर , राष्ट्रवादीचे प्रदेश ! चिटणीस अ़़ड. प्रवीण ठाकूर , जि. ळाप. चे माजी सदस्य काका ठाकूर इ. व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते . या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांनाही सन्मानित करण्यात आले.



