Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

कला; वर्षा मोटे

0 4 8 2 9 0

कला

अवगत तुला कला
शब्दांशी सहज खेळण्याची..
शब्दांना तुला जिंकता येतं..
आणि मग शब्दच..
तुझ्या अधिन होतात…
त्याना हवे तसे वागवताना..
जणू ते तुझ्या आज्ञेत राहतात..
तुझ्या शब्दांच्या स्पर्शाची जादू..
मोरपीसाहून नाहीच कमी..
मृदु मुलायमतेच्या..
अल्हाद हर्षाची देतात हमी…
तू शब्दानेच कुरवाळतोस…
अन् शब्दानेच श्वासात दरवळतोस..
थकल्या भागल्या जीवाची मरगळ..
क्षणात दूर पळवतोस…
तुझ्या शब्दांची पाखरे..
अशी मनांगणात रूंजी घालतात..
त्यांचा लडिवाळ किलबिलाट..
मला मधूर गाणी वाटतात..
तुझ्या शब्द संवादात…
नसतोच कुठला अभिनिवेश…
की नसतो मीपणाचा लवलेश…
असते ती फक्त..
निर्मळ निखळ पेशकश…
एखाद्या मंदिरातील…
घंटांचा किनकिनाट व्हावा..
तसाच तुझ्या शब्दांचा नाद..
ह्रदय गाभार्‍यात निनादत राहतो..
आणि त्याची कंपणे…
स्पंदनाशी एकरूप होवून जातात…
मला मात्र साधं सरळ
शब्दांना एकत्र गुंफता येतं..
संवादाच्या पुलावर
अर्थासहीत तुला जाणता येतं..
अर्थासहीत तुला जाणता येतं…

वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे