0
4
8
2
9
0
काजळी
मना, आतील काजळी
दूर,तुम्ही साराल का?
लख्ख, उजेडात तुम्ही
स्वतःला पाहताल का?
अज्ञान, भय, चिंतेने
का व्यापले स्वतःला?
स्पर्धात्मक या,जगात
शिका, सिद्ध व्हायला.
अत् दीप भव अमरज्योत
हृदयी तेवत,ठेवाल का?
स्वयं प्रकाशीत होऊन
वाटअंधारातून, काढाल का?
वाटचाल भविष्यवेधी करून
अंधारातून प्रकाशाकडे चालाल का?
दिवसरात्र,अथक परीश्र म,करून
ध्येय प्राप्तीच्याहीं,पुढे धावाल का?
यशाच्या मार्गातील, पक्के वैरी
समजा,आळस आणि कंटाळा,
झिडकारून द्यारे, तुम्ही त्यांना
घालून, मनाला पक्का आळा.
तुम्हीच तुमचा, आहात मार्गदाता
मार्ग सत्याचा,शोधाल का?
यश प्राप्तीसाठी विध्यार्थ्यांनों
मार्गक्रमण त्या,दिशेने कराल का?
कुसंगतीला, दूर सारून
संगत सज्जनांची,कराल का?
मला हें,पेलणारंच नाही कठीण आहे
या,न्यूनगंडास,तुम्ही दूर फेकाल का?
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
0
4
8
2
9
0



