Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 5 4 1 0 2

आंबोडी येथे विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात संपन्न

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे/ आंबोडी :(दि २ एप्रिल) ‘श्री माऊली बाल शिक्षण संस्कार वारकरी शिक्षण संस्थेत’ काव्ययोग काव्य संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी कवी संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या काव्य सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून एकपात्री कलाकार प्रा. शरदचंद्र काकडे-देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिका, समाजसेविका सौ. वसुधा नाईक, लेखक-कवी मा. गणपत तरंगे, युवा कवयित्री सायली ढेबे, शिवव्याख्याते मा. मोहनदादा तळेकर, तसेच अंजीर उत्पादक संशोधन संघ पुणेचे सचिव मा. सुरेश तात्या सस्ते उपस्थित होते. संस्थेचे सर्वेसर्वा ह.भ.प. स्वप्नील महाराज काळाणे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या भाषणातून संस्थेचे कार्य आणि मुलाचे विविध उपक्रम समजले. त्यांच्या आई ‘गुरुमाई ‘ उपस्थित होत्या. विशेष म्हणजे ही संस्था ते निशुल्क चालवतात.

या संस्थेत सध्या 150 मुले वारकरी संप्रदाय शिक्षण घेत आहेत. या संस्थेत आमचा हा पहिलाच उपक्रम होता. सर्वांकडून उत्तम साथ मिळाली. सर्व मुले निवासी आहेत. असे महाराजांनी सांगितले. या कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी कविता सादर केल्या. त्यांच्या सर्जनशीलतेची झलक पाहून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काव्ययोग काव्य संस्थेकडून सन्मानपत्र, अक्षरधन व मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांकही घोषित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या लिखाणाला चालना मिळावी व त्यांच्या काव्यगुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष योगेश हरणे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन गौरव पुंडे व मयुरी लायगुडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे