Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक १७ रोजी

जालना येथे होणार बैठकीचे भव्य आयोजन

0 4 8 2 9 4

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक १७ रोजी

जालना येथे होणार बैठकीचे भव्य आयोजन

राज्यभरातील सर्व पदाधिकारी बैठकीस लावणार हजेरी

जिल्हा प्रतिनिधी जालना

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

जालना: (दि १५) कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य सर्व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, विभागीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे महाराष्ट्रातील सर्व शिलेदार यांना सूचित करण्यात येते की कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दिनांक १७ ऑगस्ट २०२५, रविवार रोजी सकाळी ११ वाजता द्वारकानंद सभागृह, मातोश्री लॉन्स समोर, अंबड रोड, जालना येथे संघटनेतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे. तरी सर्वांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य कार्यकारीणीच्या आयोजित कार्यक्रमास उद्घाटक मा.श्री. सुरेशजी तांबे महासचिव : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.बी.डी. धुरंधर कार्याध्यक्ष: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मार्गदर्शक मा.डॉ.श्री. सतिषजी सातव, शिक्षण उपनिरीक्षक छ. संभाजीनगर विभाग उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीस प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. रविंद्र जोशी, उप शिक्षणाधिकारी (मा.), जि.प. जालना, मा.श्री. सुभाष भालेराव, उप शिक्षणाधिकारी (प्रा.), जि.प. जालना, मा.श्री. गणेश दादा मडावी, कार्याध्यक्ष : का. कर्म. महा.म.राज्य, मा.श्री. सतिष कांबळे, सरचिटणीस : का.शि. संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच मा.श्री. प्रभाकर सोनडवले, मा.श्री. सुमित भुईगळ मा.श्री. अशोक गोडवले, मा. श्रीमती कमल मनोरे, मा.श्री. राजाराम इंदवे, मा.श्री. विजयकुमार जाधव, मा.श्री. परसराम गोंडाने, मा. श्री. नागसेन धनवे, मा.श्री. सुभाष गायकवाड, मा. श्रीमती मायादेवी गायकवाड राज्यकार्यकारीणी सदस्या उपस्थित राहणार आहेत.

मा.श्री. राजेश सदावर्ते, मराठवाडा विभागीय अध्यक्ष का. शि. संघटना व मा.श्री. संतोष गवई, मराठवाडा विभागीय सरचिटणीस का.शि. संघटना यांच्यासह सर्व सदस्य सुभाष मस्के जालना जिल्हाध्यक्ष, शिवानंद खरात जिल्हा सरचिटणीस, विनोद भगत जालना जिल्हाध्यक्ष कर्म, महासंघ, जिल्हा नेते राजेश मुंगीपैठणकर, जगन्नाथ हनवते, गौतम मोरे, राजकुमार दावणगांवकर, दिनकर डोके, धर्मराज पटेकर जिल्हा कार्याध्यक्ष, के. ओ. लोखंडे जिल्हा कोषाध्यक्ष, अनिल कोल्हे जिल्हा उपाध्यक्ष, सुखदेव आवारे जिल्हा उपाध्यक्ष, डी. एल. जाधव जिल्हा उपाध्यक्ष, विकास वेडेकर जालना तालुकाध्यक्ष, रमेश देशपांडे अंबड तालुकाध्यक्ष, शामसुंदर मरके घनसावंगी तालुकाध्यक्ष, सतिष चाबुकस्वार बदनापूर तालुकाध्यक्ष, नंदलाल साळवे जालना तालुका सचिव, गौतम धिवर जालना तालुका सचिव, संतोष त्र्यंबके जिल्हा संपर्क प्रमुख, मुक्ताराम खरात संघटक, अनिलसिंह चव्हाण जालना तालुका कार्याध्यक्ष, दिलीप खराल संघटन सचिव, एम. डी. शिंदे संघटन सचिव, के. बी. मेहेत्रे संपर्क प्रमुख, आत्माराम राठोड संघटक, ए.सी. म्हस्के संघटक, राजेंद्र पैठणकर संघटक, शिवानंद जायभाये संघटक, रणजित इंगळे संघटक, संतोष डोईफोडे सहसचिव, विलास राठोड, पी.एच. जोगदंड, गणेश लांडगे, आर.ए. खंदारे, ज्ञानेश्वर झोले, संजय वाघमारे, वालीका दंवडे, संध्या भालेराव महिला प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे