Breaking
कविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

‘माधुरी सहस्रबुद्धे’ यांना बालकुमार साहित्याचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अमृता खाकुर्डीकर, पुणे

0 4 8 2 9 0

‘माधुरी सहस्रबुद्धे’ यांना बालकुमार साहित्याचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे.दि.6ऑ (प्रतिनिधी) मुलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या बालरंजन केंद्राच्या संस्थापक-संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांना “अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थे”चा जीवनगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान तथा वस्त्रोद्योग मंत्री, मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, शिक्षणतज्ञ डॉ. सविता केळकर,बालकुमार संस्थेचे राजन लाखे, दिलीप गरूड, आनंद काशीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अ.भा. बालकुमार साहित्य संस्था व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात केले होते. पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, शाल, रोख रक्कम रु. ११०००/- असे आहे. परंतु माधुरीताईंनी सत्काराचे फक्त मानपत्र व शाल एवढेच स्वीकारून पुरस्काराची रोख रक्कम मात्र बालकुमार संस्थेस देणगी म्हणून परत केली आणि पुरस्कार आपल्या दिवंगत मातोश्रींना समर्पित केला. सत्काराला उत्तर देताना माधुरीताईंनी ‘बालकुमार साहित्य संस्थे”च्या कार्याची प्रशंसा करून सर्व संबंधितांचे आभार मानले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मा. चंद्रकांत दादांनी यावेळी माधुरीताईंच्या निरपेक्ष वृत्तीने केलेल्या मूल्यसंस्कार कार्याचा गौरवाने उल्लेख केला. लहानपणीच मुलांवर असे संस्कार योग्य पध्दतीने होणे गरजेचे असल्याचे नमूद करून त्यांनी यावेळी पुणे शहरातील २५००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत शिवसृष्टी दर्शन करून देणार असल्याची घोषणा केली. मंत्रीमहोदयांच्या या घोषणेचे सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

याच कार्यक्रमात कविवर्य ग. ह. पाटील पुरस्कार डॉ. निलिमा गुंडी यांना प्रदान करण्यात आला. ग. ह. पाटील यांच्या कन्या मंदा खांडगे यांनी यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बालरंजन केंद्राच्या सर्व कार्यकर्त्या माधुरीताईंचे कुटुंबीय, शाला समितीचे अध्यक्ष, संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ.राव, शिक्षकवृंद, पालक,विद्यार्थी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे