बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे संशोधन ‘रामन परिणाम’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी दि.२८ फेब्रुवारी १९२८ रोजी हा शोध लावला. त्या शोधाच्या स्मरणार्थ १९८७ सालापासून भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, अगस्त्या फाउंडेशनचे मार्गदर्शक शिक्षक रोहन म्हात्रे सर, ईश्वर पाईकराव सर तसेच विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी प्रास्ताविकातून चंद्रशेखर वेंकट रामन यांची महती सांगितली. त्यानंतर पायल म्हात्रे [ इ. ९ वी अ ] व दक्ष घरत [ इ. ७ वी ] या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे महत्त्व तसेच चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या विषयी आपल्या मनोगतून माहिती सांगितली.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने इ. ५ वी ते इ. ७ वी साठी निबंध स्पर्धा, इ. ८ वी व इ. ९ वी साठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, इ. ८ वी व इ. ९ वी साठी रॉकेट लाँचिंग स्पर्धा, इ. ५ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले.
सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी अगस्त्या फाउंडेशनचे मार्गदर्शक शिक्षक रोहन म्हात्रे सर व ईश्वर पाईकराव सर, यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन भंडारे सर, दिलिप चव्हाण सर, सुनिल मोरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलिप चव्हाण सर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश शिंदे सर यांनी केले.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे —
*निबंध स्पर्धा–*
*प्रथम क्रमांक–* सोनाली पल्लाई [ इ. ७ वी ] *द्वितीय क्रमांक–* मनवा वाडकर [ इ. ५ वी ]
*तृतीय क्रमांक–* रक्षिता भगत [ इ. ५ वी ]
*प्रश्नमंजुषा स्पर्धा विजेता गट–*
अंकुश वायंगणकर [ इ. ९ वी अ ],
केतन ढेबे [ इ. ९ वी अ ], साईश भगत [ इ. ९ वी अ ]
*रॉकेट लाँचिंग स्पर्धा विजेता गट –*
वरद भगत [ इ. ८ वी अ ],
हिमांशू भगत [ इ.८ वी अ ],
यज्ञेश मोरे [ इ. ८ वी अ ]
*विज्ञान प्रतिकृती –*
*इ. ५ वी ते इ.७ वी गट –*
*प्रथम क्रमांक पटकाविणारा गट –*
समिर आर्य [ इ. ७ वी ],
प्रथम भगत [ इ. ७ वी ],
सार्थक काशिद [ इ.७ वी ]
*इ. ८ वी व इ. ९ वी गट –*
*प्रथम क्रमांक –* रक्षिता म्हात्रे [ इ.८ वी अ ]
स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



