
राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना, युवा सेना आक्रमक
जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या नेतृत्वात शिवसेने तर्फे राणी दुर्गावती चौकात तीव्र निषेध
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि २२) : दिल्ली येथे एआय समिटमध्ये देश विदेशातून आलेल्या अनेक दिग्गज आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी भारत मंडपम मध्ये उपस्थित होते. दिल्ली येथील प्रगती मैदानावर, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी पोहोचले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अर्ध नग्न आंदोलन करून पी एम इज कॉम्र्माइईज्ड अशा घोषणा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देऊन देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेध नोंदविला.
युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना नागपूर तर्फे राणी दुर्गावती चौकात आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख ओंकार भाऊ पारवे, महिला जिल्हाप्रमुख सौ. मनीषा पापडकर, विधानसभा संघटक गणेश सोळंके, उपजिल्हाप्रमुख महेश ठाकूर, उपजिल्हाप्रमुख गायत्री वैद्य, मनीषा पराड, कल्पना अडसुळे, विधानसभा संघटक खेमचंद कैथले, शहर सचिव सुमित लिल्हारे, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, युवा सेना शहराध्यक्ष सलमान खान, उपजिल्हाप्रमुख अभिषेक स्थूल, उपजिल्हाप्रमुख युवासेना आकाश पांडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश ठाकूर, शहराध्यक्ष युवा सेना सचिन यादव, शिवसेना उप -शहर प्रमुख नरेंद्र मगरे, शिवसेना माजी नगरसेवक जगतराम सिन्हा, शिवसेना सह संपर्कप्रमुख ओमप्रकाश यादव, वाहतूक अध्यक्ष नितीन हरदास, उपजिल्हाप्रमुख वाहतूक गौरव गुप्ता, ओम यादव, संजय राठोड, संजय कसोधन, पुनम हरवडे, मनीषा पराड, मंजुषा पाणबुडे, पुनम चाडगे, नैना दीक्षित, अमित कालहोते , निलेश सतीबावणे, कमल निमजे, राजकुमार धुर्वे , तुषार जंजाळ, प्रज्वल भोसले, आशिष वैसारे, रितेश बिसीकर, धीरज कुंभारे, सुबोध बुरुडे, प्रफुल पोफळे वंश यादव, अभिषेक सिंह, विकी यादव, अलंकार निखारे, आकाश मोहाडीकर, दिनेश वानखेडे, शिवराम वाढवे, शुभम चतुरकर, शिवसेना समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.



