Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

मनात लाडीक भाव जपणारी मनीमाऊ..!; स्वाती मराडे

गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

मनात लाडीक भाव जपणारी मनीमाऊ..!; स्वाती मराडे

गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे परीक्षण

अग्गोबाई! मनीमाऊ!!.. सापडलीस एकदाची.. काय गं कशी आहेस..? काय तुझी नवलाई, मऊ मऊ केस.. अंग कापसासारखे, घारे घारे डोळे जणू हिर्‍यासारखे, पिवळे पट्टे वाघासारखे, काळे काळे ठिपके आणि शेपटीचे झुपके, छोटे छोटे कान.. टवकारतात छान, रागावतेस जेव्हा गुरगुरतेस अशी, शोभतेस बाई तू वाघाची मावशी, लाडात येतेस तेव्हा पायात घुटमळतेस, लाडीगोडी लावून दूधभात घेतेस, मिटक्या मारत हळूहळू खातेस, पंजा फिरवत तोंड साफ करतेस, टेबलावर जाऊन ऐटीत बसतेस, आम्हा छोट्यांसोबत किती छान खेळतेस, पुढच्या दोन्ही पायांनी चेंडूला पळवतेस, आईच्या मागेपुढे सदा न् कदा फिरतेस, जवळ नाही घेतले तर खोटं खोटं रूसतेस, बाबा येताच बाहेरून, खाऊ त्यांना मागतेस, म्याव म्याव करत.. मागे त्यांच्या लागतेस.

इकडून तिकडे घरभर.. सैरावैरा धावतेस, सुस्तावलेल्या अंगाचे वेटोळे घालतेस, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतेस, प्रत्येकाच्या घरात एक लेकरू होवून राहतेस.. किती तुझे ते गुण. कमाल आहे हां तुझी..! आज खूप दिवसांनी भेट झाली ना आपली.. काय गं कशी आहेस? तसंही आजकाल कुणी कुणाला विचारत नाही, असं सारखं आई म्हणते. खरं असेलही पण मी गावाला गेले होते ना..! तिथे तुझी खूप आठवण यायची. म्हणून मी आले की आधी तुला शोधले. तू कुठे आहेस ते. मोठ्यांचं मला माहित नाही पण मी मनापासून तुला विचारतेय, काय गं कशी आहेस? तुझ्याकडे पाहून मला वाटतेय, तूही मला तेच विचारत आहेस ना?

‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेकरिता आलेले चित्र मांजरीच्या सौम्यरूपाचे दर्शन घडवणारे. एक लहान बालिका जणू आपल्या मैत्रीणीच्या थाटातच तिच्याशी संवाद साधताना जाणवते. ती मांजरसुद्धा तसाच लाडिक प्रतिसाद देत आहे असे वाटते.. मांजर हा पाळीव प्राणी अनेक घराघरात आढळतो. ती लहान मुलासारखी कधी हट्टी होते, कधी कट्टी करते आणि कधी गट्टीसुद्धा जमवते. सर्वांना इतका जीव लावते की चार दिवस तिच्यापासून दूर गेले तर ती बेचैन होते आणि जेव्हा भेटू तेव्हा पायात घुटमळते. लाडे लाडे चाळे करते. कधी कधी काही कारणास्तव अशा पाळीव मांजराला अगदी दूरवर नेऊन सोडले तरीही ती मूळ घरात कुठूनही परत येते. हे तिचे खास वैशिष्ट्य आहे.

मनात अगदीच प्रांजळभाव आणि भूतदया, करूणा, प्रेम दाटून येईल अशा चित्रावर अनेकांनी अतिशय सुंदर भाष्य केले आहे. बालजगतातील निरागसता व मोठ्यांच्या जगातील वास्तव मार्मिकतेने टिपणारी आपणा सर्वांची लेखणी मनभावनच. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे