Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

तप पूर्ण झाले

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जि.बीड

0 6 2 9 0 4

तप पूर्ण झाले

दुःखाचे तप पूर्ण झाले
वळून मागे मी पाहताना
किती उन्हाळे पावसाळे
संपले संघर्ष सोसताना …!!

आता थांबले क्षणभर मी
नव्या वळणावरती आज
जुने सारे विसरून आता
नवी पहाट हर्षाचा साज..!!

दुःखांना निरोप देते मी
पुन्हा पुन्हा जोडूनी हात
होते रक्तात धैर्य नि संयम
म्हणून करता आली मात…!!

दाखवले सारे मुखवटे मला
आभार दुःखाचे मानू किती
आनंदाचे स्वागत करताना
येतील जवळ खोटी नाती…!!

दुःख नको देवा कोणाला
आनंदाची घराघरात लाट
राहो हसरा विश्व परिवार
रोज उगावी हर्षाची पहाट..!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि.बीड
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे