
0
6
2
9
0
4
शिरजोरी
समजूतदारपणा संपतो जिथे,
तिथेच सुरू होते दादागिरी,
मग इतरांना छळणारेच
करू लागती कशी शिरजोरी!
सत्तेचा गैरवापर करती,
इतरांचे हक्क हिरावून घेती,
रोज नव्या कुरापती काढून,
आपली तुंबडी भरून घेती!
शब्दांत अहंकार, उर्मट वागणे,
पदाचा कैफ नि सत्तेचा माज,
स्वार्थलोलुप मस्तवालांना,
दुर्बळांना छळताना कसली लाज?
किती बेनामी यांची संपत्ती
बळी तो कान पिळी ही नीती,
समाजमनात नसे हो स्थान,
सत्तेची धुंदी जगात मिरवती
शिरजोरी यांच्या अंगी भिनते,
दुर्बलांची सहनशक्ती संपते,
जनशक्तीचा आवाज उठता,
मस्तवालांची मस्ती उतरते!
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जि. सांगली
==========
0
6
2
9
0
4



