नेवासा येथील प्रसिद्ध कवयित्री यांच्या ‘सप्तरंग’ काव्य संग्रहाचे प्रकाशन थाटात
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे कविता संग्रह प्रकाशित
नेवासा येथील प्रसिद्ध कवयित्री यांच्या ‘सप्तरंग’ काव्य संग्रहाचे प्रकाशन थाटात
मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे कविता संग्रह प्रकाशित
सरला दिदी,रत्नमाला लंघे व संस्थेचे विश्वस्त अशोक लांडगे यांची उपस्थिती
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नेवासा प्रतिनिधी
नेवासा: (दि २६ जाने.) नगरीतील नेवासा फाटा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय नेवासा येथील परमज्योती भवन या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम शनिवार दि.25 जानेवारी 2025 रोजी उत्साहात पार पडला. आदरणीय विजया दिदी यांनी भारतीय संस्कृतीत मकरसंक्रातीचे व हळदीकुंकवाचे महत्व सांगितले.या ठिकाणी करजगाव ता. नेवासा येथील सौ. सुरेखा विजय साळुंके(वाघमारे मॅडम) यांच्या ‘सप्तरंग’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सौ रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या उपस्थितीत आणि आदरणीय सरला दिदी व मराठीचे शिलेदार संस्थेचे विश्वस्त प्रमुख अशोक लांडगे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी आदरणीय विजया दिदी, नेवासा महिला संघाच्या अध्यक्षा आदरणीय भारतीताई बेंद्रे,वंदना दिदी, समृद्धी दिदी, श्री मुंगसे गुरुजी, श्री लांडगे सर, श्री दरोडे सर ,श्रीमती ससे मॅडम, श्रीमती बनकर मॅडम, श्रीमती फाजगे मॅडम यांच्यासह अनेक माता व बंधू-भगिनी उपस्थित होत्या. या ठिकाणी कु. सृष्टी विजय साळुंके हिने गणरायाच्या आराधनेवर उत्कृष्ट नृत्य सादर केले. सौ रत्नमालाताई लंघे यांनी सप्तरंग या काव्यसंग्रहाचे कौतुक करून कवयित्री सुरेखा साळुंके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच धकाधकीच्या जीवनात ध्यान धारणेचे महत्त्व पटवून दिले.
आदरणीय सरला दीदी यांनी संक्रांती व हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे महत्व सांगत असताना अध्यात्माचे जीवनातील महत्त्व आहे स्त्रीने मनात आणले तर खूप काही करु शकते असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिरसागर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. नळकांडे ताई यांनी केले.



