Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

ओलावा

सविता धमगाये आनंद नगर, नागपूर

0 4 8 2 9 3

ओलावा

असावी लागते कधीतरी
ओल हृदयात गहीरी
बोलतात एक करतात काही
शब्दांचे बाण तिक्ष्ण जहरी

विसरतात कधीकधी
धावपळीच्या युगात
राहून जातात मागे काही
सांगता येई ना शब्दात

वरवर दिसते कोरडे
रखरखीत तरीही फुटते
ओलावा जपतांना नात्याचा
दूर तरीही पाझर सुटते

आठवतो भयावह काळोख
सापडतो का कुठे किरण
काजवा क्षणभर जरी
होते अंधाराचे मरण

सोडली नाही आस अजून
धृवतारा मी स्थिर एकाकी
जरी गडपलो पार ढगाआड
संपली नाही जन्मतःच लकाकी.

सविता धमगाये
आनंद नगर, नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे