Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणमुंबईसाहित्यगंध

नैराश्य

मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड

0 4 8 2 8 6

नैराश्य

नैराश्य म्हणजे काळोख
नैराश्य म्हणजे माघार..
नैराश्य म्हणजे मूक भावना
नैराश्य म्हणजे अविचार…
नैराश्य म्हणजे स्वार्थी भाव..
नैराश्य म्हणजे थांबलेला प्रवाह..
नैराश्य म्हणजे कलुषित मन
नैराश्य म्हणजे संपले जीवन..
मग का? का ह्या नैराश्याला
शरणागत जाऊन घालावे लोटांगण..
यश मिळता जल्लोष करणाऱ्यांनी
अपयशाचे ही जपावे क्षण.
सोने अग्नीत तापल्या शिवाय
कळतं नाही त्याचे खरे पण..
आता मात्र लोकांना सगळे झटपट लागते..
देह झिजवण्यास नाही कोणी तत्पर वाटते..
नैराश्य त्यागून फक्त लक्ष्यावर ठेव नजर..
अपयशाचा हाती हात देऊन
आत्मविश्वासाने ओसरू द्यावा
नैराश्याचा तो वेडा बहर..

मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे