0
4
8
2
8
6
अन् पैसा झाला खोटा
ये रे ये रे पावसा म्हटलं
तर पाऊस धावून आला
अन् पैसा झाला खोटा
वेळेआधीच मान्सून आला
ऐन उन्हाळ्यात पावसाळा
साऱ्यांनीच आता अनुभवला
उन्हाळ्याच्या तलखीने हैराण
जनतेला खूप दिलासा दिला
बळीराजा चिंतेत पडला
पेरणी कि करावी मशागत
बदलत्या हवामानाचा नूर
राहिल का शिर सलामत?
पाऊस किती आला मोठा
रस्त्याची पार लागली वाट
रात्रीच जणू सूर्य दर्शन
उगवली नव्हतीच पहाट
हवामानात मोठा बदल
कि आहे धोक्याचा इशारा
प्रदूषणाचा राक्षस माजला
एकजुटीने त्याला आवरा
वृंदा(चित्रा)करमरकर
जि.सांगली
========
0
4
8
2
8
6



