Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

विचार करून वाचावं आणि वाचल्यावर विचार करावा…

वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

0 6 2 9 0 4

विचार करून वाचावं आणि वाचल्यावर विचार करावा…

वाचन म्हणजे केवळ अक्षरांवरून नजर फिरवणे नव्हे, तर त्या अक्षरांमागचा अर्थ समजून घेणे होय. ‘वाचा आणि शिका’ ‘वाचाल तर वाचाल ‘असे म्हणतात हे अगदी खरे आहे. एखादा लेख, पुस्तक किंवा विचार वाचताना आपण थोडं थांबून विचार केला, तर त्यातून मिळणारा आशय अधिक खोलवर मनात रुजतो. मन शांत करण्यासाठी, आपली ग्रहण क्षमता वाढवण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी पुस्तकांना कायम जवळ करावे. कोणत्या पुस्तकातून कोणता आशय मनाला भिडेल हे सांगता येत नाही.’यश तुमच्या हातात ‘ हे शिव खेरा यांचे पुस्तक खूप छान आहे. तर ‘ श्यामची आई ‘या पुस्तकातून मनाला भावणारे संस्कार आहेत. आपोआप वाचता, वाचता आपण कुठे बसतो का?? आपण कसे वागावे इतकी महान शिकवण मिळते.

रामायण, महाभारत, भगवतगीता अशा कादंबरीतून खूप जीवन बोध घेण्यासारखे आहे. आपल्या महाराष्ट्रात एवढे संत होऊन गेले, की आपली ही संतांची भूमी पावनभूमी झालेली आहे. यांच्या विचारांचा पगडा देखील आपल्यामध्ये आणावा असे मला वाटते. हे कधी शक्य होईल जेव्हा आपण आपल्या वेळेनुसार वाचन करू, त्याच वेळेला हे शक्य होईल. आपल्याला रोज वेळ मिळत नाही हे मला माहिती आहे ; पण हल्ली ह्या नेटवर्कच्या युगामध्ये आपल्याला ऐकून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करता येतात. हल्ली या मोठ्या मोठ्या कादंबऱ्या नेट वरती श्रवण स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत किंवा रोज एक पान जरी वाचले तरी खूप होते. बघा विचार करावा. आणि कृतीत आणावे.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी वाचतो; पण त्या किती समजून घेतो का??हा खरा प्रश्न आहे. एखादा विचार आवडला म्हणून लगेच स्वीकारण्यापेक्षा, तो आपल्या जीवनाशी किती संबंधित आहे, त्यामागील सत्य काय आहे आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. वाचन आपल्याला ज्ञान देते; पण चिंतन त्या ज्ञानाला दिशा देते. पुस्तकातील प्रत्येक वाक्य आपल्या जीवनाला लागू होईलच असे नाही.पण जे वाचले ते कुठे उपयोगी पडेल याचा विचार करावा. वाचताना विवेक जागा ठेवावा आणि वाचून झाल्यावर मनाशी संवाद साधावा. चांगले संस्कार युक्तच पुस्तक वाचावेत. अशी पुस्तक वाचावेत की त्यातून काहीतरी आपल्याला बोध घेता आला पाहिजे आणि आपल्या जीवनाशी उपयोगी झाले पाहिजे.

चांगले वाचन माणसाला केवळ माहिती देत नाही, तर त्याच्या विचारांना समृद्ध करते. एखादं छोटंसं वाक्यही कधी कधी संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतं… उदा –एखादा छान सुविचार,सुवचन, म्हण, वाकप्रचार म्हणूनच विचार करून वाचावं आणि वाचल्यावर विचार करावा. कारण वाचन डोळ्यांनी होतं; पण त्याचा खरा अर्थ मनाला आणि बुद्धीला समजला हवा. वाचनातून विचार, विचारातून विवेक आणि विवेकातून सुंदर आचरण हीच खऱ्या वाचनाची फलश्रुती आहे. हे कायम लक्षात ठेवावे.

“वाचताना शब्दांचा अर्थ मनात उतरू द्यावा,
वाचलेल्या विचारांचा जीवनात जपून प्रवेश करावा,
वाचन फक्त डोळ्यांनी न करता मनाने करावे
वाचताना विचार आणि वाचल्यावर शब्दरूप मनी उतरावा..”

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे