
0
6
2
9
0
4
भाग्य विधाता
तू शिल्पकार झाला, भारत भाग्य विधाता!
आम्हा बहुजनांना भीमा तूच मार्गदाता!! धृ!!
जातीपातीच्या तोडल्या,साखळ्या अन् बेड्या!
ज्ञानाने जागविले तू माणसा निजल्या वेड्या!!
नमते तुझ्याच चरणी चंद्र सूर्य धरणी माता!!१!!
कायदा तुझाच आहे, लोकशाही कल्याणाची!
जगामध्ये तुझ्यामुळे, शोभे शान भारताची!!
महामानव विश्वाचा ,तू दीनदलीतांचा त्राता !!२!!
शिका संघटित व्हा, मंत्र संघर्ष गाजला नभा
प्रज्ञा शील करुणेने , धम्माची उजळली प्रभा!
झाले आकाश मोकळे, झेप घेई पाखरे आता!!३!!
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जि.यवतमाळ
0
6
2
9
0
4



