राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हिंगणा तहसील कार्यालयात अभिवादन!
गजानन ढाकुलकर हिंगणा शहर प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना हिंगणा तहसील कार्यालयात अभिवादन!
नायब तहसीलदार नितीन गोहने यांचे मनोगत; समाजाला एकतेचा संदेश
गजानन ढाकुलकर
हिंगणा शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर/ हिंगणा : (दि ३०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंगणा तहसील कार्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी नायब तहसीलदार नितीन गोहने यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी आणि जयश्रीताई चव्हाण माजी सरपंच संतोष कटरे , सागर , पडोळे, संजय लांबट, श्रीराम पराते , सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करताना नितीन गोहने म्हणाले की, “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजात एकता, बंधुभाव आणि सेवा यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज आहे. प्रत्येकाने समाजासाठी जबाबदारीने काम करून त्यांच्या आदर्शांचा अंगीकार करावा.” त्यांनी सर्वांना समाजहितासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.



