Breaking
कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

चोखंदळ; राजश्री ढाकणे-मिसाळ

0 4 8 2 8 7

चोखंदळ

चोखंदळ व्यक्ती असतात
प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्मदर्शक
भाषिक कौशल्य विकसित
उत्कृष्ट व्याख्याते मार्गदर्शक…!!

अगदी अणू रेणू वस्तूदर्शक
एका नजरेत टिपतात सारे
चिकित्सकवृत्तीचे नेहमीच
यांच्या मनात वाहतात वारे…!!

शितावरून भाताची परीक्षा
यांचा हातखंडा दिसून येतो
त वरून तपेलेले ओळखायचा
गुण यांना उपजतच असतो…!!

यांची प्रत्येक काम करण्याची
इतरांपेक्षा वेगळी असते खुबी
स्वच्छ सुंदर नि नीटनेटकेपणा
त्यांच्या कार्यातील खास छबी..!!

निर्णयक्षमता चांगली असून
दूरदृष्टीचा क्षणोक्षणी वापर
आपल्या कोणत्याही चुकीचे
फोडती ना दुसऱ्यावर खापर..!!

आदर्श वाचन, चिंतन,मनन
चोखंदळ साहित्यिकाचे गुण
अष्टावधानी व्यक्तिमत्व भारी
सर्वोत्कृष्ट कार्यासाठी निपुण..!!

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे