Breaking
ई-पेपरचारोळीदादरा नगर हवेलीविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 7

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*

*🥀विषय : पेटवू मशाली*🥀
*🍂बुधवार : ०६ /०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पेटवू मशाली*

परिसीमा जाहली अन्यायाची
सहनशीलता संपुष्टात आली
अत्याचाराविरुद्ध लढायला
चला संघर्षाच्या पेटवू मशाली.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली…*

पेटवू मशाली माणुसकीच्या
कलियुगात हरवला गेला
माणसापासून माणूस लांब
आशेच्या ज्वालेची शिकू कला..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*

अभिजात मराठी संवर्धनाच्या
मराठी मनात पेटवू मशाली…
लोकसंस्कृती जतन करू जीवापाड
अभिमानाने बोलू मायबोली आपली..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*

तिमिराकडून तेजाकडे
आम्ही सदा जात राहू
पेटवू मशाली येथे
समतेचे गीत गाऊ

*सौ.अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पेटवू मशाली*

आईने खूणगाठ बांधून दिली
ज्ञानाच्या सदैव पेटवू मशाली,
ज्ञानार्जन करत राहू निरंतरच
जीवना येईल स्नेहल खुशाली.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*

मराठीची हाक, आस हाती घेऊनी
शब्दांची पेटवू मशाली सारे मिळूनी
जतन करू तिची बोली शब्द फुलांनी
साहित्य-संस्कृती वारसा पुढे नेऊनी

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️
*पेटवू मशाली*

तेवत ठेवू ज्योत ज्ञानाची
पेटवू मशाली करुणा मैत्रिची
कास धरु समता बंधुतेची
जपुयात मुल्ये लोकशाहीची

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌈🔥♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे