
0
6
2
9
0
4
वसा सृजनाचा
घडले ते होऊन गेले
वसा सृजनाचा घे बरा
बीजांचे अंकुर होऊन रहा
जीवन सुखभोगसी जन्मभरा
मराठी साहित्याच्या प्रांगणात
रोपटे वाढू लागले छत्रछायेत
साहित्याच्या मेळ्यात बागडू लागले
मराठीचे शिलेदार साथ देत
हळूहळू रोपटे वाढू लागले
मराठी शिलेदारांची नाते घट्ट झाले
काही बदल तो करू लागला
वसा सृजनांचा घेत राहिले
बक्षिसांचा वर्षाव होताच
अस्तित्व त्यांचे खुलू लागले
होई मग परिपक्व कवी
आपला रसा स्वाद देऊ लागले
निसर्ग नियमांचा हा वसा
पाणीदार मोत्यांनी भरली
रास शब्दांची ही सजली
साहित्याची किमया सृजनाने केली
सौ.कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
========
0
6
2
9
0
4



