Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

दुःख एक यातना

पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 9 0

दुःख एक यातना

दुःख एक यातना
सोसाव्या किती वेदना
चांगुलपणाच्या माथ्यावरही
किती ही अवहेलना ||१||

चांगले करू पाहतो
घडते अघटित काही
प्रयत्नांनाही आता
यशाचे दार नाही ||२||

केला किती अट्टाहास
अथक होता प्रयास
ठाऊक होते मजला
लाभते न विना सायास ||३||

कष्टास ना कंटाळलो
झाल्या जरी यातना
दाबल्या अनंत उरी
झाल्या जरी वेदना ||४||

हे दुःख आहे क्षणिक
म्हणून लढत राहिलो
रक्ताळल्या भावनांचा
उपहास मी साहिलो ||५||

मार्गावर पुढेच असेल
आनंदाचे विश्रामधाम
रखरखीत उन्हातही मी
नाही केला आराम||६||

पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो.रोहोकडी,
ता.जुन्नर ,जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे