
0
4
8
2
9
0
पतंग माझा
छान छान छान आहे
पतंग माझा किती छान
सस्यासारखा पांढराशुभ्र
पतंग माझा गोरा गोरा पान
चिंटूचा पतंग लाल लाल
पिंटुचा पतंग पिवळा फार
गणूचा पतंग निळा निळा
राजूचा पतंग आहे हिरवागार
आला आला वेगवान वारा
सारे पतंग वर वर उडाले
गेले क्षणात गगनाला भिडले
रंगीबेरंगी पतंग पक्षीच भासले
गेले उंचच उंच सर्वांचे पतंग
खेळात आली खूपच रंगत
थोडा सैल झाला चिंटूचा दोरा
लाल पतंग अडकले झाडात
सर्वांचे पतंग खाली खाली आले
माझा पतंग मात्र गगनात लहरला
विनर मीच मला फार आनंद झाला
चिंटू, पिंटू, गणू मात्र रडवेला झाला
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
4
8
2
9
0



