आभारीय शब्दसुमने’; बी.एस. गायकवाड
मराठीचे शिलेदार समूहाच्या ऋणात
‘आभारीय शब्दसुमने’; बी.एस. गायकवाड
मराठीचे शिलेदार समूहाच्या ऋणात
परवा आदरणीय राहुल दादांचा सकाळी ठीक ७: ०५वा फोन संदेश आला. तुमचा फोटो पाठवा. मी ठिक ७:१७ वा पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता लगेचच फोटो पाठवला. आज आपली वर्णी लागणार , मात्र नेमके कोणते पोष्टर झळकते की , याबद्दल उत्सुकता होती.कारण चित्र चारोळी, त्रिवेणी , बालकाव्य,आणि कविता या समूहात लिहिले होते.कविता तर दोन समूहात लिहिल्या होत्या. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. वाट पाहण्यात ही एक वेगळी मजा असते… ती मी अनुभवत होतो..पुन्हा पुन्हा समूहात डोकावून पाहत होतो.अखेर ९.२३ वा.कविता समूहात पोष्टर झळकले. बघता क्षणी आनंदाने मन भरून आले.
कारण अपेक्षा होती, कुठे तरी वर्णी लागेल. ती पूर्ण झाली. ‘हसते चेहरे,ही माझी रचना ‘आजची सर्वोत्कृष्ट रचना’ म्हणून सन्मानित करण्यात आली. त्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा, सचिव आदरणीय पल्लवी ताई, आणि मुख्य परिक्षक सविता ताई सह, सर्व परीक्षक ताई दादांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
विषय वाचला की, प्रश्न पडतो नेमके काय लिहावं बरं? पण थोडंसं चिंतन , मनन करून लिहायला बसलं की, आपोआप सुचत जातं. माझ्या रचनेत मी बहुदा कल्पना विश्वात न वावरता शक्य तो वास्तव , जीवनाशी सांगड घालण्याचा आणि जवळपास संदेशात्मक लिहिण्याचा मानस असतो. आणि त्या परीक्षकाना भावतात. अशाच आशयाची ‘हसते चेहरे’ ही रचना पण भावली आणि सर्वोत्कृष्ट ठरली. परीक्षकांचा सदैव ऋणी मी.
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण धावतो आहे. अपेक्षांचे ओझे वाहत आहे. ताण तणाव, अपेक्षाभंग, नैराश्य ,नाना व्याधींनी ग्रासलेले , दुःखी चेहरे, पाहता हसते चेहरे दुर्मिळ दिसत आहेत. प्रत्येकजन यातून जात असतांना निरोगी आयुष्यासाठी व आनंद देण्या घेण्यासाठी हसणे किती रामबाण औषध ठरू शकते. हे काव्यात मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला.
त्यासाठी प्रथमतः आपला चेहरा तोंडावर बारा वाजलेले न ठेवता, हसता चेहरा ठेवावा, जेणे करुन समोरचा ही आपल्याकडे पाहून आनंदी होईल. दादांनी दिलेले विषय खरोखरच एक आव्हान असते. आणि आपण सर्व ताई दादा ते स्वीकारून पूर्ण करतो. तसे रोजच कुणाची तरी रचना पोष्टर वर झळकत असते. आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. ती एक सुखद अनुभूती असते. आपण सर्वजण तो क्षण अनुभवत असतो.
‘मराठीचे शिलेदार’ समुहातील आदरणीय वैशालीताई, स्वातीताई, तारकाताई, वृंदाताई, शर्मिलाताई, प्रतिमाताई, विष्णू दादा, अरविंद उरकुडे सर, संग्राम दादा, अशोक लांडगे सर, हंसराज खोब्रागडे सर, आणि माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला त्या सर्व ताई, दादांचे पुनश्च एकदामनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
बी एस गायकवाड
पालम, जि.परभणी
सदस्य,मराठीचे शिलेदार समूह



