Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शब्दांची कच्चे

सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर

0 4 8 2 9 3

शब्दांची कच्चे

शब्दांचे कच्चे नि शब्दांचे लुच्चे,
मतलबी माणसे बघितले…
हिशोबाच्या त्या प्रसंग समयी,
हात झटकून ते परतले…१

नसे ठाम ते त्या दिल्या शब्दाला,
शब्दांमध्ये तयांच्या राम नसे …
स्वार्थापुरत्या व्यवहारामध्ये,
स्वार्था पुरता आराम असे…२

बघितले जे नव्हते कधी मी,
बघायला जवळून मिळाले…
स्वार्थापुढे माणुसकीचे शब्द,
प्रसंगी येऊ लागले निराळे…३

जमले नाहीत कधी वागणे,
स्वार्थीपणात जगणे ठगणे…
येती अनुभव क्षणाक्षणाला,
बघवत नाही ऐसे बघणे…४

केवळ जगणे जगण्यासाठी,
यालाच जगणे का म्हणायचे?…
स्वतः साठी सारेच जगतात,
दुजा साठी का नाही जगायचे?…५

बघितले मी जवळून कुणा,
ठोक नसे केवळ असे खुर्दा…
‘सुधाकरा’ प्रामाणिकपणाचा,
बघितला पडतांनी मुडदा…६

सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे